मुख्यमंत्रिपद हिसकावून घेऊ! काँग्रेस नेत्यांची आक्रमक भूमिका 

Edited by Shreerang K Image credit: PTI

महाविकास आघाडीचे जागावाटप होण्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदावरून भांडणे सुरू झाली आहेत.

Image credit: PTI

नागपुरात काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, ज्यात काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका मांडली.

Image credit: PTI

काँग्रेसचे अच्छे दिन येतील, आमदार निवडून येतील, त्याचे बक्षीसही नाना पटोलेंनाच मिळेल. नाही मिळाले तर विदर्भवाले ते हिसकावून घेतील, असे विकास ठाकरेंनी म्हटले.

Image credit: Vikas Thakre FB

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नाना पटोले यांना मुख्यमंत्री केल्याशिवाय विदर्भातील कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही, असे म्हटले.

Image credit: Atul Londhe FB

मुख्यमंत्रिपदाची सुप्त इच्छा असलेले काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्लीत होतो, अशी प्रतिक्रिया दिली.

Image credit: PTI

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी केली होती, ज्याकडे काँग्रेस-राष्ट्रवादीनंही दुर्लक्ष केले होते. 

Image credit: PTI

शिवसेना (उबाठा) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी याबाबत म्हटले की, नेत्यांबद्दल समर्थकांनी केलेली वक्तव्ये अडचणीची ठरू शकतात. 

Image credit: Sanjay Raut FB

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उबाठा) या तीन पक्षांतील जागावाटप अद्याप पूर्ण झालेले नाही.

Image credit: PTI

जागावाटपानंतर सर्वाधिक जागा कोण लढवणार हे स्पष्ट होईल. सर्वाधिक जागा लढवणाऱ्या पक्षाला सर्वाधिक जागा जिंकण्याची संधी असेल. 

Image credit: Nana Patole X

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षालाच जास्त जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Image credit: Nana Patole X

मविआला मतदारांचा स्पष्ट कौल मिळाला व काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या तर जास्त जागा जिंकणाऱ्या पक्षालाच मुख्यमंत्रिपद मिळावे, असा दावा काँग्रेस करू शकते.

Image credit: Nana Patole X

आणखी वाचा

कधी विचार केला नव्हता, पण नियतीने मला राजकारणात आणले : PM मोदी

marathi.ndtv.com