तुम्हाला आलेला मेसेज खरा आहे का? शेवटच्या अक्षरात दडलंय सत्य, पोलिसांनी सांगितली ट्रिक
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva हल्ली ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
Image credit: Canva ऑनलाइन फसवणुकीला सर्वसामान्यांनी बळी पडू नये, यासाठी पोलिसांकडून वारंवार जनजागृती केली जाते.
Image credit: Canva सर्वसामान्यांची फसवणूक रोखण्यासाठी नवीन मुंबई पोलिसांनी देखील सोपा उपाय सांगितलाय.
Image credit: Canva तुम्हाला आलेला मेसेज खरा आहे का? हे कसे जाणून घ्यावे, याबाबत पोलिसांनी महत्त्वाची माहिती सोशल मीडियावर शेअर केलीय.
Image credit: Navi Mumbai Police Insta पोलिसांनी सांगितलेला सोपा उपाय लक्षात ठेवा आणि मेसेजच्या शेवटी असलेले अक्षर तपासा.
Image credit: Navi Mumbai Police Insta मेसेजच्या शेवटी G असेल तर मेसेज सरकारी खात्यांकडून आलाय.
Image credit: Navi Mumbai Police Insta S असेल तर सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून मेसेज आलाय.
Image credit: Navi Mumbai Police Insta T हे अक्षर असेल तर बँक व्यवहारांशी संबंधितांकडून मेसेज आलाय.
Image credit: Navi Mumbai Police Insta P हे अक्षर असेल तर जाहिरात, ऑफर आणि प्रमोशन करणाऱ्या कंपनीकडून मेसेज आलाय.
Image credit: Navi Mumbai Police Insta मेसेजच्या शेवटी काहीच नसेल तर तो मेसेज फसवणुकीचा असण्याची शक्यता जास्त आहे, असे पोलिसांना सांगितलंय.
मेसेजच्या शेवटी असणारे कोड फक्त TRAI नोंदणीकृत संस्थांनाच मिळतात: नवीन मुंबई पोलीस
Image credit: Canva बँक डिटेल्स शेअर करू नका आणि अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका, असे आवाहनही पोलिसांनी केलंय.
Image credit: Canva आणखी वाचा
जेव्हा कुंकू स्फोटकांमध्ये बदलतं तेव्हा काय परिणाम होतात, हे सर्वांनी पाहिलंय: PM मोदी
marathi.ndtv.com