'संधी मिळाली तर बंदूक घेऊन...' पहलगाम हल्ल्यावर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

एनडीटीवीच्या इमर्जिंग बिझनेस कॉन्क्लेव्हमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता सहभागी झाल्या होत्या. 

Image credit: PTI

रेखा गुप्ता यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केलीय. 

Image credit: PTI

जर संधी मिळाली तर बंदूक घेऊ आणि त्यांच्यावर गोळ्या झाडू: रेखा गुप्ता

Image credit: PTI

मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकते की संपूर्ण देशात,दिल्लीत, येथील उपस्थितांमध्येही हल्ला पाहिल्यानंतर मनात हीच भावना आली असेल: रेखा गुप्ता

Image credit: PTI

प्रत्येक व्यक्ती हाच विचार करतोय की मला संधी मिळाली पाहिजे: रेखा गुप्ता

Image credit: PTI

22 एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. 

Image credit: PTI

मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. 

Image credit: PTI

दुसरीकडे पहलगाम हल्ल्याबाबत बोलावण्यात आलेल्या जम्मू-काश्मीर विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला भावुक झाले होते. 

Image credit: PTI

माफी मागण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केलीय. 

आणखी वाचा

महाराष्ट्रातील त्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्काराने गौरवण्यात यावे, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

marathi.ndtv.com