महाराष्ट्रातील त्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्काराने गौरवण्यात यावे, सुप्रिया सुळेंची CMकडे मागणी

Edited by Harshada J S Image credit: IANS/PTI
Image credit: PTI

खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मोठी मागणी केलीय. 

सुप्रिया सुळेंनी पत्रामध्ये नेमके काय म्हटलंय, जाणून घेऊया...

Image credit: PTI

जम्मू काश्मीर या राज्यातील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांची हत्या करून दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली:सुप्रिया सुळे

Image credit: PTI

भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने, दिलिप डिसले, कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे हे रहिवाशी मरण पावले:सुप्रिया सुळे

Image credit: PTI

आपल्या घरातील कर्ते पुरुष अतिरेकी अगदी टिपून-टिपून मारत असताना इतर कुटुंबीयांनी या कठीण प्रसंगाचा धीरोदात्तपणे सामना केला:सुप्रिया सुळे

Image credit: Supriya Sule Insta

आपली जीवाभावाची माणसं डोळ्यांदेखत मारली जात असताना अशी हिंमत दाखवणे सोपे नाही:सुप्रिया सुळे

Image credit: PTI

म्हणूनच या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 6 जणांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'नागरी शौर्य' पुरस्काराने गौरवण्यात यावे :सुप्रिया सुळे

Image credit: PTI

तसेच या कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक योग्यतेनुसार शासकीय सेवेत सामावून घ्यावे,अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केलीय. 

Image credit: PTI
Image credit: IANS

मला खात्री आहे की महाराष्ट्र शासन या विनंतीचा नक्कीच विचार करुन त्यावर सकारात्मक निर्णय जाहीर करेल, असाही विश्वास सुळेंनी व्यक्त केलाय.

आणखी वाचा

 पर्यटकांवर भ्याड हल्ला, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरचे PHOTOS

marathi.ndtv.com