सोशल मीडियावरच्या 'त्या' व्हिडीओंमुळे संताप, आराध्या बच्चनची कोर्टात धाव
Edited by Harshada J S Image credit: Aishwarya Rai Insta ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनची लेक आराध्या बच्चनने दिल्ली हायकोर्टामध्ये नवीन याचिका दाखल केलीय.
Image credit: Aishwarya Rai Insta याचिकेद्वारे आराध्याने काही वेबसाइटवरील तिच्या आरोग्याबाबतची खोटी-दिशाभूल करणारी माहिती डिलिट करण्याचे आवाहन केलेय.
Image credit: Aishwarya Rai Insta दिल्ली हायकोर्टाने या प्रकरणात गुगल,सोशल मीडिया अकाउंटसह काही वेबसाइट्सना आराध्याशी संबंधित कंटेंट हटवण्याचे आदेश दिले होते.
Image credit: Aishwarya Rai Insta तरीही काही वेबसाइट्सवर अजूनही फेक कंटेट उपलब्ध आहे, यामुळे आराध्याने नवीन याचिका दाखल केलीय.
Image credit: Aishwarya Rai Insta आराध्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने सोमवारी (3 फेब्रुवारी) गुगलला नोटिसही जारी केलीय.
Image credit: ANI हायकोर्टाने 20 एप्रिल 2023 रोजी यू-ट्युबला आराध्याच्या आरोग्याशी संबंधित फेक व्हिडीओ तातडीने हटवण्याचे निर्देश दिले होते.
Image credit: Aishwarya Rai Insta आराध्याने याचिकेत म्हटलं होतं की, यू-ट्युब व्हिडीओमध्ये मी अतिशय गंभीर स्वरुपात आजारी असल्याचे दाखवण्यात आलंय.
Image credit: Aishwarya Rai Insta आराध्याने मागील याचिकेमध्ये असेही म्हटलं होतं की, काही व्हिडीओमध्ये तिचा मृत्यू झाल्याचाही दावा करण्यात आला होता.
Image credit: Aishwarya Rai Insta दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी 17 मार्च रोजी होणार आहे.
Image credit: Aishwarya Rai Insta आणखी वाचा
बिनकपड्याची 'बियांका', ग्रॅमीमध्ये आचरटपणामुळे धमाका
marathi.ndtv.com