इमारतीत भीषण अग्नितांडव, वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI दिल्लीतील द्वारका परिसरातील रहिवासी इमारतीच्या आठव्या-नवव्या मजल्यावर भीषण आग लागली.
Image credit: PTI स्वतःचा बचाव करण्यासाठी वडिलांसह दोन मुलांनी इमारतीतून खाली उड्या मारल्यानं त्यांचा मृत्यू झालाय.
Image credit: PTI पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे वय 10-12 वर्षादरम्यान आहे. यामध्ये एक मुलगी आणि एका मुलाचा समावेश आहे.
Image credit: PTI वडील यश यादव (वय 35 वर्ष) यांनाही बालकनीमधून उडी मारल्यानं त्यांचाही मृत्यू झालाय.
Image credit: PTI दुर्घटनेत यादव यांची पत्नी आणि भाची गंभीररित्या जखमी झाल्या आहेत.
Image credit: PTI अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 10.01 वाजता त्यांनी सपथ सोसायटीमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली.
Image credit: PTI अग्निशमन दलाने सुरुवातीस आठ गाड्या घटनास्थळी पाठवल्या होत्या.
Image credit: PTI घटनास्थळी पोहोचल्यानंतर आगीचे स्वरुप भीषण असल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाने आणखी गाड्या पाठवण्यात आल्या.
आणखी वाचा
हातात तिरंगा आणि चेहऱ्यावर अभिमान, PM मोदींनी चिनाब पुलावरुन दिला जगाला संदेश
marathi.ndtv.com