श्री तुळजाभवानी देवीचरणी 11 तोळे सोन्याची माळ अर्पण

तुळजापुरातील श्री तुळजाभवानी देवीचरणी भाविकाने 11 तोळे सोन्याची माळ अर्पण केलीय. 

परभणीतील भाविक जयश्री देशमुख यांनी ही माळी अर्पण केली आहे. 

मंदिर संस्थानचे व्यवस्थापक विश्वास कदमांनी देशमुख परिवाराचे देवीची प्रतिमा, श्रीफळ,शाल देऊन सत्कारही केला. 

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे सत्कार करण्यात आल्याने देशमुख परिवाराने आनंद व्यक्त केला. 

नवसपूर्ती करण्यासाठी देशमुख परिवाराने 11 तोळे सोन्याची माळ देवीचरणी अर्पण केली. 

यापूर्वीही अनेक भाविकांनी तुळजाभवानी चरणी कित्येक मौल्यवान गोष्टी अर्पण केल्या आहेत. 

आणखी वाचा

प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिराची इतक्या कोटींमध्ये होणार डागडुजी

marathi.ndtv.com