इवल्याशा पानांमुळे या गंभीर आजाराचा त्रास होऊ शकतो कमी

Edited by Harshada J S Image credit: Canva
07/07/2024

कढीपत्त्यामुळे स्वयंपाकाची चव वाढतेच शिवाय  आरोग्याच्या कित्येक प्रकाराच्या समस्यांपासूनही मुक्तता मिळू शकते. 

07/07/2024 Image credit: Canva

एका अशाच आजाराबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत, ज्यापासून कढीपत्त्याच्या इवल्याशा पानांमुळे काही प्रमाणात त्रास कमी होऊ शकतो. 

07/07/2024 Image credit: Canva

मधुमेहामुळे शरीरामध्ये रक्तशर्करेची पातळी वाढते. मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी लोक कित्येक उपाय करतात.

07/07/2024 Image credit: Canva

तुम्हाला माहिती आहे का? कढीपत्त्याच्या सेवनामुळे रक्तशर्करा नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते.

07/07/2024 Image credit: Canva

कढीपत्त्यामध्ये फायबर व अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. रक्तातील शर्करा नियंत्रणात आणण्यासाठी हे घटक उपयुक्त ठरतात. 

07/07/2024 Image credit: Canva

कढीपत्त्यामुळे शरीरातील इंसुलिनचे उत्पादन वाढते, ज्यामुळे शरीरातील रक्तशर्करा नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते. 

07/07/2024 Image credit: Canva

मधुमेहाचे रुग्ण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कढीपत्त्याचे सेवन करू शकतात. तसेच तुम्ही डाएटमध्येही कढीपत्त्याचा समावेश करू शकतात. 

07/07/2024 Image credit: Canva

मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी 10-12 कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास खूप फायदे मिळू शकतात. यामुळे रक्तशर्करा नियंत्रणात राहते. 

07/07/2024 Image credit: Canva

कढीपत्त्याचा चहा देखील करून तुम्ही पिऊ शकता. 

07/07/2024 Image credit: Canva

खाद्यपदार्थांमध्येही कढीपत्त्याचा समावेश करावा, उदा. डाळ, भाज्या इत्यादी. यामुळे स्वयंपाकाची चव देखील वाढेल. 

07/07/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

07/07/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

सुटलेली ढेरी पटकन जाईल आत, सकाळी प्या हे ड्रिंक्स

marathi.ndtv.com