आयुष्यात दारुवर गाणं गाणार नाही, पण... प्रसिद्ध गायकाचे सरकारला आव्हान
Edited by Harshada J S
Image credit: Diljit Dosanjh Insta
पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ त्याच्या 'दिल लुमिनाटी' कॉन्सर्टमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलाय.
Image credit: Diljit Dosanjh Insta
तेलंगाणा सरकारने 'दिल लुमिनाटी' कॉन्सर्टच्या आयोजकांना नोटीस धाडलीय.
Image credit: Diljit Dosanjh Insta
दिलजीत दोसांझने कॉन्सर्टमध्ये दारु, हिंसा, अमली पदार्थांवरील गाणी गाऊ नये; अशा सूचना तेलंगाणा सरकारने दिल्या आहेत.
Image credit: Diljit Dosanjh Insta
पंज तारा आणि पटियाला पेग यासारख्या गाण्यांचा नोटीसमध्ये विशेषतः उल्लेखही करण्यात आलाय.
Image credit: Diljit Dosanjh Insta
दिलजीतनेही याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून तेलंगाणा सरकारवर निशाणा साधलाय.
Image credit: Diljit Dosanjh Insta
मी कित्येक धार्मिक गाणीही गायलीयेत पण प्रत्येक जण पटियाला पेग गाण्यावर चर्चा करताहेत - दिलजीत
Image credit: Diljit Dosanjh Insta
चला एकत्र येऊ आणि मोहीम सुरू करू - दिलजीत
Image credit: Diljit Dosanjh Insta
सर्व राज्यांनी स्वतःला ड्राय स्टेट घोषित केले तर शब्द देतो मी आयुष्यात दारुवर गाणं गाणार नाही. हे होऊ शकते का? - दिलजीत
Image credit: Diljit Dosanjh Insta
जिथे-जिथे माझे शो झालेत, तिथे एका दिवसासाठी ड्राय डे घोषित करा. मग मीही दारुवर गाणं गाणार नाही - दिलजीत
Image credit: Diljit Dosanjh Insta
दिलजीत दोसांझने अनेक प्रश्न उपस्थित करत तेलंगाणा सरकारलाच खुले आव्हान दिले आहे.
Image credit: Diljit Dosanjh Insta
आणखी वाचा
हिना खान पोहोचली मालदीवमध्ये, शेअर केले सुंदर PHOTOS
marathi.ndtv.com