सज्जनगडावर मशाल महोत्सवाचा उत्साह
मशाल महोत्सवाकरिता राज्यभरातून शेकडो लोक सज्जनगडावर दाखल झाले होते.
'छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय' अशा जयघोषामध्ये सज्जनगडावर मशाल उत्सव पार पडला.
सज्जनगडावर गुरुवारी (31 ऑक्टोबर) पहाटे 3.30 वाजता मशाल महोत्सवास सुरुवात झाली.
किल्ले सज्जनगड संवर्धन समूह, दुर्गनाद प्रतिष्ठानच्यावतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
फटाक्यांची आतशबाजी, हलगी-तुतारीचा निनाद आणि शेकडो मशालींमुळे परिसर प्रकाशमय झाला होता.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची सुंदर सजवलेली पालखी घेऊन शेकडो लोक सज्जनगडावर दाखल झाले.
या उपक्रमांतर्गत साहसी खेळांचेही आयोजन करण्यात आले होते.
पारंपरिक वेशभूषेमध्ये शेकडो नागरिकांनी मशाल महोत्सवामध्ये उपस्थिती दर्शवली.
आणखी वाचा
दिवे तिळाच्या तेलाचेच का लावावे, तज्ज्ञांनी सांगितला महत्त्वपूर्ण उपाय
marathi.ndtv.com