DNA टेस्ट म्हणजे काय? कशी केली जाते तपासणी
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva DNA म्हणजे शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये असणारे Deoxyribonucleic Acid, ज्याद्वारे व्यक्तीची ओळख निश्चित करण्यास मदत मिळते.
Image credit: Canva DNA टेस्ट ही एक वैज्ञानिक पद्धत आहे ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीची ओळख, नातेसंबंध किंवा आजाराचा शोध घेतला जाऊ शकतो.
Image credit: Canva DNA टेस्टसाठी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या रक्ताचे नमुने आवश्यक असतात.
Image credit: Canva नातेवाईकांमध्ये आईवडील, अपत्य, भाऊबहीण, आजीआजोबा, काका यांच्या रक्तांचे नमुने घेतले जाऊ शकतात.
Image credit: Canva सर्वप्रथम मृत व्यक्तीच्या शरीराच्या उपलब्ध असणाऱ्या भागांपासून नमुने घेतले जातात. त्वचा असेल तर त्वचेचे नमुने घेतले जातात.
Image credit: Canva पूर्णपणे जळलेल्या मृतदेहांच्या प्रकरणात दात, मांडीचे हाड, केस किंवा टिश्यूंचे नमुने घेतले जातात.
Image credit: Canva यानंतर कुटुंबीयांच्या रक्ताचे नमुने घेतले जातात.
Image credit: Canva रक्ताचे नमुने देणारा पुरुष असेल तर मृत व्यक्तीच्या Y गुणसूत्रांशी जुळवून तपासणी केली जाते.
Image credit: Canva रक्ताचे नमुने देणारी महिला असेल तर मृत व्यक्तीच्या X गुणसूत्रांशी जुळवून तपासणी केली.
Image credit: Canva या तपासणीद्वारे मृत व्यक्ती संबंधित व्यक्तीचा नातेवाईक आहे की नाही, हे निश्चित केले जाते.
Image credit: Canva साधारणतः डीएनए तपासणीसाठी एक किंवा दोन दिवसांचा कालावधी लागतो.
Image credit: PTI पालक किंवा मुलांचे नमुने उपलब्ध असल्यास चाचणी अधिक अचूक असते.
Image credit: PTI अहमदाबाद विमान अपघातासारख्या घटनांमध्ये मृतांच्या संख्या अधिक असल्यास नमुने वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये पाठवले जातात.
Image credit: PTI त्यामुळे रिपोर्ट्स येण्यास अधिक वेळ देखील लागू शकतो.
आणखी वाचा
बिटाची कोशिंबीर खाण्याचे मोठे फायदे, जाणून घ्या रेसिपी
marathi.ndtv.com