कणिक मळताना मिक्स करा या गोष्टी, पोट होईल एकदम स्वच्छ

पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवायचीय? तर पोळीच्या पिठामध्ये काही गोष्टी मिक्स केल्यास फायदा मिळू शकतो. 

Image credit: Canva

पोळीच्या पिठामध्ये या चार गोष्टी मिक्स केल्यास पोटाशी संबंधित 4 मोठ्या गोष्टींपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

ओव्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत, ज्यामुळे पचनप्रकिया सुधारते. गॅसच्या समस्येतून सुटका मिळते. 

Image credit: Canva

अळशीच्या बियांमध्ये फायबर अधिक असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो. 

Image credit: Canva

मेथीच्या बियांमधील पोषणतत्त्व आतड्यांची सूज कमी करण्याचे आणि पचनप्रक्रिया सुधारण्याचे काम करते. 

Image credit: Canva

हिंग पावडरमध्ये अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत, यामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या कमी होते. 

Image credit: Canva

अर्धा चमचा ओवा, एक चमचा अळशीची पावडर/ मेथीची पावडर,चिमूटभर हिंग गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करा व कणिक मळा. 

Image credit: Canva

अशा पद्धतीने पोळी तयार करून खाल्ल्यास पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत माहितीये?

marathi.ndtv.com