ड्रिंक अँड ड्राइव्ह केल्यास अशी होते कारवाई? सेलिब्रिटी वकिलांनी दिली महत्त्वाची माहिती

Edited by Harshada J S Image credit: Sana Khan Insta
Image credit: Canva

दारु पिऊन गाडी चालवल्यास कोणत्या स्वरुपात कारवाई होते, याची सविस्तर माहिती वकील सना खानने दिलीय.

Image credit: Canva

जर कोणी दारू पिऊन गाडी चालवत असेल तर मोटर वेहिकल्स कायदा 1988च्या कलम 185 अंतर्गत हा गुन्हा आहे.

Image credit: Canva

रक्तामध्ये मद्याचे प्रमाण 0.03 टक्क्यांपेक्षा अधिक आढळल्यास कारवाई करण्यात येते.

Image credit: Canva

पहिल्या वेळेस 6 महिन्यांचा तुरुंगवास किंवा 10 हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

Image credit: Canva

दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास 2 वर्षे तुरुंगवास किंवा 15  हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

Image credit: Canva

यासह ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित किंवा रद्द देखील करण्यात येऊ शकते. 

Image credit: Canva

अपघात झाल्यास संबंधिताविरोधात कठोर कलम लावले जाऊ शकतात.

Image credit: Canva

निष्काळजीपणामुळे कोणाचा मृत्यू झाल्यास, चालक फरार झाल्यास 10 वर्षे कैद किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

Image credit: Canva

BNS कलम 281 म्हणजे निष्काळजीपणामुळे दुसऱ्यांचा जीव धोक्यात घातल्यास 6 महिने कैद किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

Image credit: Canva

म्हणूनच दारू पिऊन गाडी चालवणे नेहमीच टाळावे. स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालू नये.

आणखी वाचा

उद्धव ठाकरेंनी हिंदी भाषेबाबत घेतली महत्त्वाची भूमिका, म्हणाले...

marathi.ndtv.com