Health Tips: हे फळ कच्चे खाल्ल्यास आरोग्यापासून ते त्वचेपर्यंत मिळतील इतके लाभ
Edited by Harshada J SImage credit: Canva
22/06/2024
कच्च्या अथवा पिकलेल्या पपईचे सेवन केल्यास आरोग्यास फायदेच मिळतात. पण आज आपण कच्च्या पपईचे आरोग्यवर्धक लाभ जाणून घेणार आहोत.
Image credit: Canva22/06/2024
कच्च्या पपईमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फॉलेट, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम यासारखे गुणधर्म मोठ्या प्रमाणात आहेत.
Image credit: Canva22/06/2024
कच्च्या पपईतील'व्हिटॅमिन सी'मुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. संसर्गाचा धोका कमी होतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.
Image credit: Canva22/06/2024
कच्च्या पपईमध्ये पॅपेन नावाचे एंझाइम असते. ज्यामुळे अन्नाचे पचन सहज होते व अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून सुटका होऊ शकते.
Image credit: Canva22/06/2024
कच्च्या पपईमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आणि फायबर अधिक असते. यामुळे चयापचयाची क्षमता सुधारते.
Image credit: Canva22/06/2024
कच्च्या पपईमध्ये व्हिटॅमिन 'सी'-'ए'यासारखे अँटी-ऑक्सिडेंट्सही आहेत. ज्यामुळे त्वचा निरोगी राहते. वाढत्या वयाची लक्षणे कमी होतात व फ्री रॅडिकल्सपासून त्वचेचे संरक्षण होते.
Image credit: Canva22/06/2024
'व्हिटॅमिन ए'चा उत्तम स्त्रोत म्हणजे कच्चे पपई. यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत मिळते.
Image credit: Canva22/06/2024
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva22/06/2024
आणखी वाचा
ऑपरेशनच्या वेळेस डॉक्टर निळ्या किंवा हिरव्या रंगाचे कपडे का परिधान करतात?