महिलांनो तुमच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील 'या' इवल्याशा बिया

Edited by Harshada J S Image credit: Amruta Khanvilkar Insta

निरोगी आरोग्य जगायचे असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार डाएटमध्ये अळशीच्या बियांचा समावेश करावा.

Image credit: Canva

अळशीमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड, डाएट्री फायबर, प्रोटीन आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, हे घटक आरोग्यास पोषक आहेत. 

Image credit: Canva

महिलांनी अळशीच्या बियांचे सेवन केल्यास मासिक पाळीच्या समस्या कमी होतात. यातील गुणधर्मांमुळे हार्मोन्सची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

अळशीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी व फॅटी अ‍ॅसिड आहेत, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते. मुरुम आणि एक्झिमासारख्या समस्या दूर होतात. 

Image credit: Canva

अळशीच्या बियांमुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. बियांमधील पोषकघटकांमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

अळशीमुळे केसगळती, केस कोरडे होणे इत्यादी समस्यांपासून सुटका मिळते. केसांची चांगली वाढही होते.

Image credit: Canva

वजन घटवण्यासाठीही अळशीच्या बिया लाभदायक आहेत. अळशीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आहेत, ज्यामुळे पोट दीर्घकाळापर्यंत भरलेले राहते.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

Weight Loss: या गोष्टी खाल्ल्यास वजन पटापट होईल कमी, दिसाल एकदम स्लिम

marathi.ndtv.com