घरच्या घरी झटपट तयार करा रसगुल्ले
रसगुल्ल्यांचे केवळ नाव घेताच तोंडाला पाणी सुटते. रसगुल्ले तयार करण्यासाठी दूध, मैदा, लिंबू, साखरेच्या पाकाची आवश्यकता असते.
Image credit: Canva Edited by Harshada J S रसगुल्ले तयार करण्यासाठी सर्वप्रथम दुधापासून पनीर तयार करा.
Image credit: Canva दुधामध्ये लिंबाचा रस मिक्स करावा. गॅसच्या मध्यम आचेवर दूध गरम करावे आणि दूध घट्ट होऊ लागल्यानंतर गॅस बंद करावा.
Image credit: Canva फाटलेले दूध थंड होऊ द्यावे. यातील पाणी बाहेर काढा आणि पनीर चाळणीमध्ये जवळपास 4 तासांसाठी ठेवून द्यावे.
Image credit: Canva यानंतर पनीर व्यवस्थित मॅश करून घ्या.
Image credit: Canva मैदा किंवा रवा पनीरमध्ये मिक्स करा आणि पुन्हा मॅश करा. एका पॅनमध्ये 4-6 कप पाणी उकळत ठेवा.
Image credit: Canva पनीरचे गोळे तयार करा आणि उकळत्या पाण्यामध्ये ठेवा. पॅनवर झाकण ठेवावे. गोळे व्यवस्थित शिजू द्यावे.
Image credit: Canva गोळे शिजल्यानंतर ते थंड होण्यास ठेवून द्या. गोळे थंड झाल्यानंतर त्यातील पाणी पाणी काढा आणि रसगुल्ले साखरेच्या पाकामध्ये ठेवा.
Image credit: Canva तयार झाले आहेत रसगुल्ले. साखरेचा पाक आवडत नसल्यास तुम्ही रसगुल्ले पाकातून बाहेरही काढून ठेवू शकता.
Image credit: Canva आणखी वाचा
दुधामध्ये तूप आणि हळद मिक्स करून पिण्याचे फायदे
marathi.ndtv.com