दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत लष्कर अधिकाऱ्यासह 4 जवान शहीद 

Edited by Harshada J S Image credit: Canva
16/07/2024

जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील जंगलात सोमवारी (15 जुलै) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कर अधिकाऱ्यासह 4 जवान शहीद झाले आहेत.

16/07/2024 Image credit: Canva सर्व फोटो प्रतिकात्मक

मागील 10 दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांची दहशतवाद्यांशी चकमक होण्याची ही दुसरी वेळ आहे. 

16/07/2024 Image credit: Canva

परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर डोडामधील उत्तर भागात भारतीय लष्कर व जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली.

16/07/2024 Image credit: Canva

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 9 वाजता जवानांचा दहशतवाद्यांशी सामना झाला व यानंतर जोरदार गोळीबार करण्यात आला.

16/07/2024 Image credit: Canva

परिसरात जवानांकडून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

16/07/2024 Image credit: Canva

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय रायफल्स-जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी संध्याकाळी 7.45 वाजता धारी गोटे उरारबागी येथे शोधमोहीम सुरू केली. 

16/07/2024 Image credit: Canva

चकमकीदरम्यान चार जवानांना वीरमरण आले.

16/07/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

कुलरसमोर बसण्यावरून वाद, वधुने थेट लग्न करण्यास दिला नकार 

marathi.ndtv.com