गणेशोत्सवात मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ट्राफिक पोलिसांचा मोठा प्लान 

Edited by Harshada J S Image credit: Canva

गणेशोत्सवादरम्यान मुंबईच्या रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडोर संकल्पना मांडली आहे. 

Image credit: Canva

ग्रीन कॉरिडोरमुळे नवी मुंबई ते मुंबई विमानतळ प्रवास अवघ्या 50 मिनिटांत करणे शक्य होईल. सध्या हे अंतर दोन तासांचे आहे.

Image credit: Canva

ग्रीन कॉरिडोरमुळे प्रवाशांचा प्रवास कसा सुकर होईल? जाणून घेऊया... 

Image credit: Canva

नवी मुंबईहून अटल सेतूद्वारे येणारी वाहने पीडीमेलो रोडद्वारे सीएसएमटीच्या दिशेने वळवली जातील.

Image credit: Canva

सीएसएमटीहून ही वाहने मंत्रालय मार्गे मरीन ड्राईव्हहून पुढे कोस्टलरोडच्या दिशेने वळवली जातील.

Image credit: Canva

कोस्टल रोडहून प्रवाशांना पुढे वांद्रे वरळी-सी लिंक मार्गे, पश्चिम द्रुतगती मार्गे मुंबई विमानतळाकडे जाता येणार आहे.

Image credit: Canva

ग्रीन कॉरिडोरच्या प्रत्येक टप्प्यावर वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात असतील.

Image credit: Canva

मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावरून येणारी वाहतूक ही लालबाग उड्डाण पुलाखालून भारतमाता सिग्नलहून करी रोडच्या दिशेने वळवली जाईल.

Image credit: Canva

पुढे वाहतूक ना.म.जोशी मार्गे दक्षिण मुंबईकडे वळवण्यात येणार आहे.

Image credit: Canva

यानंतर लोढा पे अ‍ॅड पार्क किंवा कल्पतरू पे अ‍ॅड पार्कचा वापर करावा.

Image credit: Canva

लालबागच्या राजाच्या दर्शनाकरिता येताना भाविकांनी लोकलने यावं, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.

Image credit: Canva

आणखी वाचा

'एकवेळ पंतप्रधान नसतील तरी चालेल पण...' रितेश देशमुख थेट म्हणाला

marathi.ndtv.com