Ganeshotsav 2024: गणपती बाप्पाच्या 39 हजार मूर्ती साकारणारा अवलिया
Edited by Harshada J S Image credit: Pranjal Kulkarni गणपती बाप्पा हा जसा विघ्नहर्ता आहे तसाच तो कलेची देवताही आहे.
Image credit: Pranjal Kulkarni गणेशोत्सवादरम्यान कलाकार कोणत्या-न्-कोणत्या माध्यमातून आपली कला सादर करत असतात.
Image credit: Pranjal Kulkarni नाशिकमधील एका कलाकाराचीही सध्या सर्वत्र चर्चा आहे.
Image credit: Pranjal Kulkarni नाशिकमधील एका अवलियाने बाप्पाच्या एक-दोन नव्हे तर 39 हजार सूक्ष्म मूर्ती साकारल्या आहेत.
Image credit: Pranjal Kulkarni संजय क्षत्रिय असे या मूर्तिकाराचे नावे आहे आणि ते सिन्नर येथील रहिवासी आहेत.
Image credit: Pranjal Kulkarni शाडूची माती आणि डिंकापासून विविध रूपातील सुबक मूर्ती त्यांनी घडवल्या आहेत.
Image credit: Pranjal Kulkarni एक मूर्ती घडवण्यासाठी संजय क्षत्रिय यांना साधारणतः दोन तासांचा अवधी लागतो.
Image credit: Pranjal Kulkarni विशेष म्हणजे या सर्व मूर्ती शाडू मातीसह अगदी खडू, सिम कार्ड्ससह नखांवरही त्यांनी हजारो मूर्ती साकारल्या आहेत.
Image credit: Pranjal Kulkarni काही मूर्तींचे डोळे पाहण्यासाठी चक्क भिंगाचा वापर करावा लागतो इतक्या त्या लहान आहेत.
Image credit: Pranjal Kulkarni हार्डवेअर आणि पेंटिंगच्या व्यवसाय करणारे संजय क्षत्रिय वयाच्या 22व्या वर्षांपासून सूक्ष्म मूर्ती घडवण्याचा छंद जोपासत आहेत.
Image credit: Pranjal Kulkarni या सर्व मूर्ती त्यांनी वेगवेगळ्या बॉक्समध्ये जतन करून ठेवल्या आहेत.
Image credit: Pranjal Kulkarni संजय क्षत्रिय यांच्या कलेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Image credit: Pranjal Kulkarni आणखी वाचा
नाशिकमधल्या शहाणे कुटुंबीयांकडे जर्मनीतून खास गौरींचे आगमन
marathi.ndtv.com