दोन दिवसांत चौपाटी परिसरातून 363 मेट्रिक टन घन कचरा जमा करण्यात आला आहे.
निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याची कार्यवाही महानगरपालिकेने केली आहे.
निर्माल्य संकलनासाठी 500 हून अधिक निर्माल्य कलश आणि 350 निर्माल्य वाहक वाहने नेमलेली होती.
पर्यावरण पूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी यंदा 69 नैसर्गिक स्थळांसह एकूण 204 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सुमारे 7 हजार कामगार, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा मोहीमेमध्ये सहभाग होता.
Image credit: ANI
चौपाट्यांवरील विशेष स्वच्छता मोहिमेत खाद्यपदार्थांचे रॅपर्स, पाण्याच्या बाटल्या, पिशव्यांसह इतर वस्तूही जमा करण्यात आल्या आहेत.
Image credit: ANI
महानगरपालिकेच्या 24 प्रशासकीय विभागांमध्ये असणाऱ्या विविध 37 सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पांमध्ये हे निर्माल्य नेण्यात आले आहे.
Image credit: ANI
साधारणपणे एका महिन्यात या निर्माल्याचे रूपांतर सेंद्रिय खतामध्ये होईल. हे खत महानगरपालिका उद्यानांमध्ये वापरण्यात येणार आहे.
Image credit: ANI
आणखी वाचा
लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी