GBS Virus: मुंबईत गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी, रुग्ण पुण्यातून आल्याचे उघड
Edited by Harshada J S Image credit: Canva
मुंबईमध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. 23 जानेवारीला त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
Image credit: Canva
11 फेब्रुवारी 2025 रोजी 53 वर्षीय रुग्णाचा मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.
Image credit: Canva
रुग्णाला GBSची लागण झाल्याचे निदान झाले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Image credit: Canva
रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) औषधोपचार सुरू होते.
Image credit: Canva
रुग्णाला श्वासोच्छवास प्रक्रियेमध्ये त्रास होत होता, त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
Image credit: Canva
रुग्णामध्ये यापूर्वी कोणत्याही प्रकारचा ताप किंवा अतिसार अशा आजाराचे लक्षण आढळले नव्हते.
Image credit: Canva
तसेच हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याआधी हा रुग्ण 16 दिवसांपूर्वी पुण्यातून मुंबईमध्ये आल्याचीही माहिती समोर आलीय.
Image credit: Canva
गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या उपचारासाठी मुंबईतील सर्व महानगरपालिका रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये सुसज्ज आहेत.
Image credit: Canva
रुग्णांसाठी आवश्यक औषधोपचार, साधनसामग्री आणि तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध असल्याचेही शासनाकडून सांगण्यात आले आहे.
Image credit: Canva आणखी वाचा
गुइलेन बॅरे सिंड्रोमची लक्षणे माहिती आहेत का?
marathi.ndtv.com