स्टार प्रवाहवरील प्रेक्षकांची आवडती नायिका पुन्हा येतेय, वैभव मांगले दिसणार वडिलांच्या भूमिकेत

Image credit: Vaibhav Mangale Insta

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेद्वारे गौरी म्हणजे गिरीजा प्रभू घराघरात पोहोचली.

प्रेक्षकांची ही लाडकी नायिका खास लोकग्रहास्तव नव्या रुपात पुन्हा भेटीला येणार आहे. 

कोण होतीस तू, काय झालीस तू! या नव्याकोऱ्या मालिकेद्वारे गिरीजा प्रेक्षकांचे पुन्हा मनोरंजन करणार आहे.

Image credit: Girija Prabhu Insta

मालिकेमध्ये कावेरी सावंत असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. 

Image credit: Girija Prabhu Insta

कावेरी सावंत ही अतिशय हुशार, बिनधास्त आणि स्पष्टवक्ती अशी व्यक्तिरेखा आहे. 

Image credit: Girija Prabhu Insta

पुन्हा एकदा नवं पात्र साकारायची संधी दिल्याबाबत गिरीजाने स्टार प्रवाह वाहिनीचे आभार मानले आहेत. 

Image credit: Girija Prabhu Insta

मालिकेची गोष्ट कोकणातील आहे, त्यामुळे गिरीजा कोकणी भाषा शिकतेय. 

Image credit: Girija Prabhu Insta

मालिकेत गिरीजाच्या वडिलांची भूमिका वैभव मांगले साकारत आहेत. त्यांच्याकडूनच गिरीजा कोकणी भाषेचे धडे घेतेय.

Image credit: Girija Prabhu Insta

बाप-लेकीच्या नात्याचा घट्ट बंध या मालिकेत पाहायला मिळेल, असेही गिरीजाने सांगितलंय.

Image credit: Girija Prabhu Insta

आणखी वाचा

होश उड़ाये अदा... मराठमोळ्या अभिनेत्रीचा ग्लॅमरस लुक PHOTOS

marathi.ndtv.com