गुरुपौर्णिमेनिमित्त जळगावातील श्री व्यास मंदिरात भाविकांची गर्दी
Edited by Harshada J SImage credit: Mangesh Joshi
Image credit: Mangesh Joshi
आषाढ पौर्णिमा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता म्हणून यास व्यास पौर्णिमाही म्हटलं जाते.
महर्षी वेद व्यासांनी महाभारत,श्रीमद् भागवत, ब्रह्म सूत्र आणि 18 पुराणांचे लेखन केल्याचा उल्लेख शास्त्रार्थात आढळतो, त्यामुळे महर्षी वेदव्यासांना आद्य गुरू संबोधले जाते.
Image credit: Mangesh Joshi
Image credit: Mangesh Joshi
म्हणूनच गुरुपौर्णिमेला महर्षी वेदव्यास यांची पूजा केली जाते. यानिमित्ताने जळगावातील श्री व्यास मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती.
देशात महर्षी व्यासांचे केवळ तीन ठिकाणी मंदिर आहेत.
Image credit: Mangesh Joshi
Image credit: Mangesh Joshi
यापैकी एक मंदिर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामधील यावल येथे आहे.
Image credit: Mangesh Joshi
यावल हे शहर सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी वसलेले असून महाभारत काळात या ठिकाणी घनदाट जंगल होते.
Image credit: Mangesh Joshi
काही वर्षे महर्षी व्यासांचे वास्तव्य या यावल नगरीत होते.
Image credit: Mangesh Joshi
यावल नगरीतील वास्तव्यादरम्यान महर्षी व्यासांनी महाभारतातील काही श्लोक या ठिकाणी रचल्याचा उल्लेख काही ग्रंथांमध्ये आहे.
Image credit: Mangesh Joshi
यावल येथील वेद महर्षी व्यासांच्या मंदिराला साडेपाच हजार वर्षांचा इतिहास असल्याचे मानले जाते.
Image credit: Mangesh Joshi
गुरुपौर्णिमेनिमित्त यावल येथील श्री व्यास मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो.
Image credit: Mangesh Joshi
यंदा पहाटे चतुर्वेदी ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात वेद महर्षी व्यासांची महापूजा आणि महाअभिषेक करण्यात आला.
आणखी वाचा
'सैराट' फेम आर्ची 20 वर्षांनंतर आषाढी वारीत सहभागी PHOTOS