रात्री झोपण्यापूर्वी करा हे काम, सकाळी पोट होईल पटकन स्वच्छ 

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

पोट स्वच्छ होत नसल्याच्या समस्येमुळे बरेच लोक कायम त्रस्त असतात.

Image credit: Canva

तुम्ही देखील बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर रात्री झोपण्यापूर्वी हे काम करा. 

Image credit: Canva

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करा आणि ते पाणी प्या. यामुळे सकाळी पोट स्वच्छ होण्यास मदत मिळू शकते. 

त्रिफळ चूर्णाचंही रात्री सेवन केल्यास सकाळी पोट स्वच्छ होईल. या आयुर्वेदिक उपायामुळे संपूर्ण शरीरास लाभ मिळतील. 

Image credit: Canva
Image credit: Canva

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास ओव्याचे पाणी प्यावे. 

Image credit: Canva

रात्री जेवल्यानंतर बडिशेप खाल्ल्यास पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. बडिशेपचे पाणी देखील उपयोगी ठरू शकते. 

Image credit: Canva

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात एक चमचा तूप मिक्स करुन प्यायल्यास पोट स्वच्छ होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा

भिजवलेल्या 'या' चॉकलेटी रंगाच्या बिया खाण्याचे मोठे फायदे

marathi.ndtv.com