भिजवलेल्या 'या' चॉकलेटी रंगाच्या बिया खाण्याचे मोठे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Sharvari Wagh Insta

आरोग्य निरोगी राहावे, यासाठी डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून कायम दिला जातो. 

Image credit: Canva

डाएटमध्ये महागड्या गोष्टींचाच समावेश करावा, असेही काही आवश्यक नाही. छोट्या-छोट्या बियाही खाणे फायद्याचे ठरू शकते.

Image credit: Canva

भिजवलेल्या अळशीच्या बिया खाणे आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते. जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती... 

Image credit: Canva

अळशीमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असते, जे हृदयासाठी फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

अळशीमध्ये फायबर अधिक असते, ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून सुटका मिळते. 

Image credit: Canva

अळशीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

अळशीतील पोषणतत्त्वांमुळे महिलांच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

अळशीमध्ये फायबर आणि प्रोटीन अधिक प्रमाणात असते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

भिजवलेल्या अळशीचे सेवन केल्यास त्वचा आणि केसांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

प्रचंड थकल्यानंतरही झोप येत नाही? हा उपाय केल्यास येईल गाढ झोप

marathi.ndtv.com