केस होतील मजबूत आणि कोंडाही होईल कमी, फॉलो करा सोप्या टिप्स
Edited by Harshada J S Image credit: Canva
हिवाळ्यामध्ये कोंड्याची समस्या निर्माण होणे ही फार सामान्य बाब आहे.
Image credit: Canva
काही घरगुती उपाय केल्यास कोंड्याच्या त्रासातून सुटका मिळू शकते. जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
तेलामध्ये जास्वंदाचे फुल आणि पाने मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्कॅल्पसह केसांवर लावा. तासाभरानंतर केस पाण्याने धुऊन घ्या.
Image credit: Canva
ऑलिव्ह ऑइलमध्ये अंडे मिक्स करा. हे पॅक केसांवर तासाभराकरिता लावा. केस मजबूत होतील आणि कोंडाही कमी होईल.
Image credit: Canva
टी ट्री ऑइलचे काही थेंब नारळाच्या तेलामध्ये मिक्स करा आणि केसांवर लावा. यामुळे कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
कांदा आणि लसूण किसून घ्या, याचा रस काढा आणि स्कॅल्पवर लावा. एक तासानंतर केस स्वच्छ धुऊन घ्या.
Image credit: Canva
स्कॅल्पवर दही 10-15 मिनिटांसाठी लावा आणि केस कोमट पाण्याने धुऊन घ्या. या उपायामुळे कोंड्याची समस्या कमी होऊ शकते.
Image credit: Canva
नारळाच्या तेलामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि हे मिश्रण केसांवर लावा. अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुऊन घ्या.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
कडुलिंबाची पाने चावून खाण्याचे 8 फायदे
marathi.ndtv.com