महिनाभर तुपात भाजलेले मखाणे खाल्ल्यास काय होईल?

Edited by Harshada J S  Image credit: Canva

भूक शांत करण्यासाठी लोक बहुतांश वेळेस काहीही खातात, यानंतर त्यांना पश्चातापही होतो. पण सवय काही केल्या बदलत नाही. 

Image credit: Canva

पण तुपात भाजलेले मखाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, हे तुम्हाला माहितीये का?

Image credit: Canva

तुपात भाजलेले मखाणे चवदार आणि आरोग्यासाठी फायदेशीर पर्याय ठरू शकतो. 

Image credit: Canva

मखाण्यांमध्ये पोषणतत्त्वांचा साठा मोठ्या प्रमाणात आहे, शिवाय तुपामध्ये भाजल्यास त्यातील फायदे अधिक वाढतात. 

Image credit: Canva

तुपात भाजलेले मखाणे महिनाभर खाल्ल्यास आरोग्यामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात. 

Image credit: Canva

मखाण्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते. तुपात मखाणे भाजल्यास त्यांचे पचनही सहजरित्या होते.

Image credit: Canva

तुपामध्ये भाजलेल्या मखाण्यांमध्ये कॅलरीचे प्रमाण कधी आणि पोषणतत्त्वांचा साठा अधिक असतो.

Image credit: Canva

मखाण्यांमध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण अधिक असल्याने वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही.

Image credit: Canva

मखाण्यांमध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम यासारख्या खनिजांचा समावेश अधिक आहे, यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

  भिजवलेले की सुके मनुके, कोणता पर्याय आहे फायदेशीर?

marathi.ndtv.com