डोक्यापासून ते पायापर्यंतच्या आजारांवर रामबाण उपाय आहेत ही इवलीशी पाने

Edited by Harshada J S Image credit: Canva

मोरिंगा खाण्याचे आरोग्यदायी फायदे सर्वांनाच माहिती आहेत. दक्षिणेकडील राज्यांमध्ये याचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. 

Image credit: Canva

मोरिंगा ही एक अशी भाजी, ज्याचे प्रत्येक आठवड्यात सेवन केल्यास शरीराला असंख्य फायदे मिळतील.

Image credit: Canva

मोरिंग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते, यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. 

Image credit: Canva

मोरिंग्याच्या पानांचे सेवन केल्यास केस-त्वचा सुंदर होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

मोरिंग्याची पाने खाल्ल्यास रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. मधुमेहग्रस्तांसाठी ही भाजी खाणे फायदेशीर ठरेल. 

Image credit: Canva

मोरिंग्याच्या पानांमध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. 

Image credit: Canva

मोरिंग्यामध्ये फायबर अधिक असते, यामुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येतून सुटका मिळते. 

Image credit: Canva

मोरिंग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, के व्हिटॅमिन, लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, झिंक यासारखी पोषणतत्त्व असतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. 

Image credit: Canva

मोरिंग्याच्या पानांचे सूप किंवा भाजी तयार करुन खाऊ शकता. सॅलडमध्येही मोरिंग्याच्या पानांचा समावेश केला जातो. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे

marathi.ndtv.com