मोरिंग्याची पाने चावून खाण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

मोरिंग्याचे सूप पिण्याचे फायदे सर्वांनाच माहिती आहे. पण मोरिंग्याच्या पानांमध्येही पौष्टिक गुणधर्मांचा खजिना आहे, हे तुम्हाला माहितीये का?

Image credit: Canva

मोरिंग्याच्या पानांमध्ये प्रोटीन, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशिअमसह कित्येक पोषकघटक आहेत. 

Image credit: Canva

अँटी-ऑक्सिडंट्स, खनिजे, झिंक, लोह, फॉस्फरसचेही प्रमाण जास्त आहे. या पोषकघटकांमुळे शरीराला कित्येक लाभ मिळतात. 

Image credit: Canva

मधुमेहाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी मोरिंग्याची पाने फायदेशीर ठरतील. 

Image credit: Canva

रोज सकाळी रिकाम्या पोटी मोरिंग्याची पाने खाऊ शकता किंवा पाण्यात उकळून ते पाणी पिऊ शकता. 

Image credit: Canva

मोरिंग्याच्या पानांमध्ये फायटोकेमिकल्स असतात, यामुळे रक्तशर्करेची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मोरिंग्याच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत, जे पोटाच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात. 

Image credit: Canva

मोरिंग्याची पाने खाल्ल्यास हाडे मजबूत होतील, सांध्यांचे दुखणे कमी होईल. या पानांमध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉरस्फरचे प्रमाण अधिक आहे. 

Image credit: Canva

मोरिंग्याच्या पानांमधील पोषकघटकांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. हृदयविकारांचा धोका कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी काय खावे?

marathi.ndtv.com