मधामध्ये काळी मिरी मिक्स करुन खाण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

आयुर्वेदानुसार मध आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म आहेत. 

Image credit: Canva

मधामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, व्हिटॅमिन ए,सी, झिंक, कॉपर, लोह, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम यासारख्या तत्त्वांचा समावेश आहे. 

Image credit: Canva

मधातील पोषणतत्त्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

मधामध्ये काळी मिरी मिक्स करुन खाल्ल्यास आरोग्यास दुप्पट फायदे मिळतील. 

Image credit: Canva

मध-काळ्या मिरीमुळे पचनप्रक्रिया सुधारेल. पोटातील जळजळ दूर होईल. 

Image credit: Canva

मधामध्ये नैसर्गिक साखर, अँटी-बायोटिक तर काळ्या मिरीमध्ये व्हिटॅमिन सी, फ्लेव्हेनॉइड्स गुणधर्म आहेत, ज्यामुळे संसर्गाविरोधात लढण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मध-काळ्या मिरीमुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मधामुळे त्वचा हायड्रेट राहते. काळ्या मिरीतील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे मुरुमांची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 तळव्यांना नारळाचे तेल लावण्याचे फायदे

marathi.ndtv.com