कबुतरांच्या विष्ठेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

काहींना कबुतर पाळण्याची आवडत असते. पण कबुतर आणि त्यांच्या विष्ठेमुळे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. 

Image credit: Canva

कबुतर आणि त्यांच्या विष्ठेमुळे मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम होतो. डॉ. निमित नागडा यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया...

Image credit: Canva

कबुतरांच्या विष्ठेमुळे हिस्टोप्लाज्मोसिस, सिटाकोसिस, क्रिप्टोकोकोसिस हे बुरशीजन्य आजार होतात.

Image credit: Canva

तर जिवाणू संसर्गामुळे साल्मोनेलोसिस आणि कॅम्पिलोबॅक्टरिओसिस या आजारांची समस्या निर्माण होऊ शकते.

Image credit: Canva

अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शनमुळे हायपरसेसिटिव्हिटी न्युमोनायटिस हा अतिशय त्रासदायक आजार होऊ शकतो. 

Image credit: Canva

हायपरसेसिटिव्हिटी न्युमोनायटिस हा दीर्घकाळ प्रभाव राहणार आजार आहे, यामुळे फुफ्फुसांशी संबंधित आजार बळवतात. 

Image credit: Canva

हिस्टोप्लाज्मोसिस आजारात फुफ्फुस, श्वसनाचे गंभीर विकार, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.

Image credit: Canva

सिटाकोसिस आजारात ताप येतो, ज्याची लक्षणे फ्लूसारखी असतात.

Image credit: Canva

क्रिप्टोकोकोसिस आजारात फुफ्फुस तसेच गंभीर प्रकरणांमध्ये मेंदू आणि मणक्याचेही आजार होऊ शकतात.

Image credit: Canva

साल्मोनेलोसिस आजारात अतिसार, उलट्या आणि ताप यासारख्या समस्या उद्भवू शकतात. 

Image credit: Canva

गंभीर आजारांची समस्या टाळण्यासाठी कोणते उपाय करावे, याबाबत माहिती जाणून घेऊया...

Image credit: Canva

कबुतर पाळत असाल तर त्यांची संख्या नियंत्रित करावी. 

Image credit: Canva

कबुतरांची विष्ठा स्वच्छ करताना हातमोजे-मास्क वापरावे. यानंतर हात-पाय तोंड स्वच्छ धुवावे.

Image credit: Canva

कबुतरांची विष्ठा आणि दूषित पृष्ठभागांशी थेट संपर्क कमी करावा आणि शक्यतो टाळावा.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

  डिजिटल नोमॅड व्हिसा म्हणजे काय? इतके डॉलर्स कमावू शकता, जाणून घ्या फायदे

marathi.ndtv.com