खजूर दुधात भिजवून खाण्याचे मोठे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Unsplash उन्हाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते.
Image credit: Canva शरीराला थंडावा देणाऱ्या खाद्यपदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा.
Image credit: Canva पण उन्हाळ्यात गरम प्रकृतीच्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करावा की करू नये, याबाबतही अनेकांच्या मनात गोंधळ निर्माण होतो.
Image credit: Unsplash खजूरमध्ये कित्येक पोषणतत्त्वांचा समावेश आहे, पण ते गरम प्रकृती असते. त्यामुळे उन्हाळ्यात खजूर खावे की खाऊ नये, असा प्रश्न अनेकांना पडतो.
Image credit: Unsplash उन्हाळ्यात खजूर दुधामध्ये भिजवून खाल्ल्यास आरोग्यास कित्येक फायदे मिळतील. जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Unsplash अशक्तपणा जाणवल्यास खजूर आणि दूध एकत्रित खावे. याद्वारे शरीराला ऊर्जा, प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमिन्सचा पुरवठा होईल.
Image credit: Unsplash पचनाशी संबंधित समस्या असणाऱ्यांनी दुधात खजूर भिजवून खावे. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळेल.
Image credit: Unsplash शरीराची रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा मजबूत होईल.
Image credit: Unsplash खजूरचे मर्यादित स्वरुपातच सेवन करावे. दिवसभरात 2-3 पेक्षा जास्त खजूर खाणे टाळा.
Image credit: Unsplash गरम दुधाऐवजी कोमट किंवा थंड दुधामध्ये खजूर भिजवावे.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
केशरचे पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे
marathi.ndtv.com