कोणत्या लोकांनी रोज नाश्त्यामध्ये शिळी पोळी खाल्ली पाहिजे?
Edited by Harshada J S Image credit: Canva
शिळी पोळी खायचे म्हटलं की
लोक तोंड मुरडतात. तर काही लोक
थेट खाणं टाळतात.
Image credit: Canva
पण काही लोकांसाठी शिळी पोळी खाणे फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva
पोळी शिळी झाल्यानंतर ती खराब होत नाही तर पौष्टिक होते. कारण यातील पोषणतत्त्वांचे प्रमाण वाढते, असे म्हणतात.
Image credit: Canva
शिळी पोळी कोणी खाल्ली पाहिजे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
Image credit: Canva
पोळीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते आणि रक्तशर्करेची पातळी देखील नियंत्रणात राहते.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी एक शिळी पोळी थंड दुधामध्ये भिजवून खाल्ल्यास रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहते. वारंवार भूक देखील लागत नाही.
Image credit: Canva
शिळ्या पोळीमध्ये फायबर अधिक असते, यामुळे पचनप्रक्रिया निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
शिळ्या पोळीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होऊ शकते. यामुळे वजन कमी होण्यासही मदत मिळू शकते.
Image credit: Canva
शिळ्या पोळीमध्ये लोह आणि झिंक यासारख्या खनिजांचा समावेश आहे. लोहामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते.
Image credit: Canva
शिळ्या पोळीमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते, यामुळे हाडे-दात मजबूत होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
रिकाम्या पोटी केळी खाण्याचे मोठे दुष्परिणाम
marathi.ndtv.com