हार्ट अटॅक सोमवारीच का येतो? डॉ. नेनेंनी सांगितले गंभीर कारण

Edited by Harshada J S Image credit: Canva

हृदयविकाराच्या झटक्यामुळे लोकांच्या मृत्यू होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ होताना दिसतेय.

Image credit: Canva

शाळकरी मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढलंय. 

Image credit: Canva

कोणाचा खेळताना, व्यायाम करताना तर कोणाचा संवाद साधताना हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. 

Image credit: Canva

पण हार्ट अटॅकची समस्या विशिष्ट दिवशीच का उद्भवतेय? याचे कारण तुम्हाला माहितीय का...

Image credit: Canva

सोमवारच्या दिवशीच लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढलंय. 

Image credit: Canva

कित्येक संशोधनातील माहितीनुसार सोमवारच्या दिवशीच हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण सर्वाधिक आढळलंय.

Image credit: Canva

अभिनेत्री माधुरी दीक्षितचा पती डॉ. श्रीराम नेनेंच्या माहितीनुसार सोमवारी हार्ट अटॅक येण्यामागील कारण शरीराच्या सर्कॅडियन रिदमशी जोडलेले असू शकते. 

Image credit: Canva

वीकेंडच्या दिवशी विश्रांती घेतल्यानंतर बहुतांश लोकांच्या झोपेच्या वेळेत सोमवारच्या दिवशी बिघाड होतो. 

Image credit: Canva

झोपेच्या वेळेत बिघाड झाल्याने शरीरामध्ये ताणतणाव वाढतो, असे तज्ज्ञांचे म्हणणंय.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 गुलाबाची पाने खाण्याचे जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com