उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यावे का? शरीराला कोणते मिळतील लाभ

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा त्रास होणे ही सामान्य समस्या आहे. 

Image credit: Canva

उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणे अतिशय आवश्यक आहे. 

Image credit: Canva

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी लिंबू पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

लिंबू पाण्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असते, यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. 

Image credit: Canva

लिंबू पाण्यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते, ज्यामुळे अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

लिंबू पाणी प्यायल्यास पचनाशी संबंधित एंझाइमचे उत्पादन वाढते. यामुळे अपचन, पोटातील सूज, वेदना कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

लिंबू पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर फेकले जाण्यास मदत मिळते आणि यकृत देखील डिटॉक्स होते. 

Image credit: Canva

पण जास्त प्रमाणात लिंबू पिणे टाळावे अन्यथा अ‍ॅसिडिटी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

Hair Care Tips : बापरे! शरीरातील या कमतरतेमुळे होते केसगळती?

marathi.ndtv.com