नियमित 1 चमचा या बिया खाल्ल्यास केस लांबसडक होण्यासह मिळतील 9 मोठे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
डाएटमध्ये अळशीचा समावेश केल्यास मोठे फायदे मिळतील. अळशीमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Image credit: Canva
अळशीच्या बियांमध्ये फायबर असते, ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्येतून सुटका होऊ शकते.
Image credit: Canva
अळशीचे नियमित सेवन केल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत मिळते.
Image credit: Canva
मधुमेहग्रस्तांसाठी अळशीच्या बिया फायदेशीर ठरू शकतात. कारण यातील पोषणतत्त्वांमुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
अळशीतील फायबरमुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या दूर होते.
Image credit: Canva
अळशीच्या सेवनामुळे त्वचेवर तेज येते आणि केसांचीही चांगली वाढ होते.
Image credit: Canva
अळशीमध्ये लिगनन नावाचे अँटी-ऑक्सिडंट्स आहे, जे शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करते.
Image credit: Canva
अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, यामुळे शरीरावरील सूज कमी होते.
Image credit: Canva
अळशीतील कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम पोषणतत्त्वांमुळे हाडे मजबूत होतात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
हिवाळ्यात ही पिवळी पावडर खाण्याचे जबरदस्त फायदे
marathi.ndtv.com