जास्त पाणी प्यायल्यास जाऊ शकतो जीव? तज्ज्ञाकडून धक्कादायक खुलासा

Edited by Harshada J S Image credit: Canva

आरोग्य निरोगी राहावे, यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे. यासाठी नियमित 8-10 ग्लास पाणी प्यावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. 

Image credit: Canva

जास्त प्रमाणात पाणी अपायकारकही ठरू शकते. 

Image credit: Canva

नुकत्याच करण्यात आलेल्या रीसर्चमधील आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आली आहे.

Image credit: Canva

कॅनडातील मॅकगिल युनिव्हर्सिटी हेल्थ सेंटरच्या रीसर्च इन्स्टिट्युटमधील एका टीमने पाण्याशी संबंधित महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. 

Image credit: Canva

जास्त पाणी प्यायल्यास जीवघेणा हायपोनॅट्रेमिया आजाराचा धोका वाढू शकतो. 

Image credit: Canva

शरीर हायड्रेट राहण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे. पण अतिरिक्त पाणी प्यायल्यास जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. 

Image credit: Canva

शरीरामध्ये अतिरिक्त पाणी जमा झाल्यास किडनी अतिरिक्त द्रवपदार्थ बाहेर फेकण्यास असमर्थ ठरते. 

Image credit: Canva

जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास रक्तातील सोडिअमचे प्रमाण कमी होते, या परिस्थितीस वैद्यकीय भाषेत हायपोनॅट्रेमिया असे म्हणतात. 

Image credit: Canva

शरीरातील सोडिअमची पातळी कमी झाल्यास डोकेदुखी, उलट्या होणे, थकवा आणि मेंदूला सूजही येऊ शकते.

Image credit: Canva

तज्ज्ञांच्या माहितीनुसार शरीराच्या रचनेनुसार म्हणजे उंची, वजन आणि व्यायाम करण्याच्या सवयीनुसार पाणी पिण्याचे प्रमाण कमीजास्त होऊ शकते. 

Image credit: Canva

तज्ज्ञाच्या मते दिवसभरात 8-10 ग्लास पाणी प्यावे.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

Onion Benefits : कांदा खाण्याचे सात जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com