Alert! भेसळयुक्त तूप खाताय? ओळखण्यासाठी घरातच करा 5 सोप्या टेस्ट 

Edited by Harshada J S Image credit: Canva
2/07/2024

तुपाच्या सेवनामुळे आरोग्यास मिळणारे फायदे लक्षात घेता हल्ली बहुतांश जण डाएटमध्ये तुपाचा समावेश करू लागले आहेत.

2/07/2024 Image credit: Canva

दुसरीकडे मार्केटमधील तुपामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचंही आढळते. 

2/07/2024 Image credit: Canva

भेसळयुक्त तूप आरोग्यास किती हानिकारक ठरू शकते, हे तुम्हाला माहिती असेलच. 

2/07/2024 Image credit: Canva

तुपात भेसळ झालीय की नाही? हे तुम्ही घरबसल्याही तपासू शकतात. 

2/07/2024 Image credit: Canva

भेसळयुक्त तूप हे लोणी, डालडा व हायड्रोजेनेटेड तेल एकत्रित करून तयार केले जाते. याशिवाय बटाटाही मिक्स केला जातो.

2/07/2024 Image credit: Canva

एक ग्लास पाण्यात 1 चमचा तूप मिक्स करा, जर तूप तरंगू लागले तर ते भेसळयुक्त नाही आणि तूप ग्लासच्या तळाशी गेले तर ते भेसळयुक्त आहे.

2/07/2024 Image credit: Canva

तूप तळहातावर रगडा. भेसळ नसल्यास त्याचा सुगंध उशीरापर्यंत हातांवर राहील, भेसळ असेल तर सुगंध जास्त काळ टिकणार नाही. 

2/07/2024 Image credit: Canva

तूप गरम करा, पुढील 24 तासांत रंग पिवळा राहिला आणि आधीसारखा सुगंध असेल तर तूप शुद्ध आहे.

2/07/2024 Image credit: Canva

थोडेसे तूप गरम करा व त्यात साखर मिक्स करा. तुपाचा रंग हलकासा लाल झाल्यास तुपात भेसळ करण्यात आली आहे, हे लक्षात घ्या. 

2/07/2024 Image credit: Canva

घरातील व बाजारातील तुपाची तुलना करून पाहा. रंग व टेक्श्चरवरून यातील फरक तुम्हाला लगेचच जाणवेल. 

2/07/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

2/07/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

तुती खाण्याचे अद्भुत फायदे

marathi.ndtv.com