मधुमेहग्रस्त 'हा' गोड-पातळ पदार्थ खाऊ शकतात? काय होतील परिणाम

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

आरोग्याशी संबंधित समस्या टाळण्यासाठी मधुमेहग्रस्त रुग्णांना गोड पदार्थ अधिक प्रमाणात खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. 

Image credit: Canva

मधामध्येही नैसर्गिक साखरेचे प्रमाण असते. म्हणून मधुमेहग्रस्त रुग्ण मधाचे सेवन करू शकतात का? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. 

Image credit: Canva

मधामध्ये फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचे प्रमाण असतात. या घटकांमुळे रक्तशर्करेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतात. 

Image credit: Canva

मधाचे ग्लायसेमिक इंडेक्स साखरेच्या तुलनेत कमी असते. म्हणजेच मध साखरेच्या तुलनेत थोड्या धीम्या गतीने रक्तशर्करेची पातळी वाढवू शकते. 

Image credit: Canva

मध हे नैसर्गिक साखरेचे स्त्रोत आहे, त्यामुळे अतिरिक्त प्रमाणात मधाचे सेवन केल्यास रक्तशर्करेची पातळी वाढण्याची भीती असते. 

Image credit: Canva

मधुमेहग्रस्त रुग्णांनी अतिशय मर्यादित स्वरुपात मधाचे सेवन करावे. 

Image credit: Canva

मधाचे सेवन केल्यानंतर नियमित स्वरुपात रक्तशर्करेची पातळी तपासावी. जेणेकरून शरीरावर होणारे परिणाम तुमच्या लक्षात येतील. 

Image credit: Canva

मधाचे सेवन करण्यापूर्वी मधुमेहग्रस्तांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

प्रेमानंद महाराज म्हणतात, सकाळी उशीरापर्यंत झोपणाऱ्यांच्या 3 गोष्टी होतात नष्ट

marathi.ndtv.com