दिवसभरात किती केळी खाणे आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर?

Edited by Harshada J S Image credit: Canva
12/05/2024

केळ्याचे सेवन केल्यास आरोग्यास कित्येक पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. पण दिवसभरात किती केळी खाणे योग्य ठरेल? जाणून घेऊया माहिती... 

12/05/2024 Image credit: Canva

केळ्यामध्ये पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, फायबर या पोषणतत्त्वांचे प्रमाण मुलबक आहे. तुमच्या आहारामध्ये या घटकांचा समावेश असणे आवश्यक आहे. 

12/05/2024 Image credit: Canva

केळ्याच्या सेवनामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहते. कारण यातील फायबर ग्लुकोजच्या उत्सर्जन प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. 

12/05/2024 Image credit: Canva

फायबरसह अन्य पोषणतत्त्वांमुळे अन्नाचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते व पचनसंस्थेचे कार्यही सुधारते. 

12/05/2024 Image credit: Canva

केळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम हे गुणधर्म असतात, ज्यामुळे हाडे मजबूत व निरोगी राहण्यास मदत मिळते.

12/05/2024 Image credit: Canva

दिवसभरात 1-2 केळी खाणे आरोग्यासाठी योग्य ठरेल. कारण आहारामध्ये पोषणतत्त्वांचा समतोल असणे गरजेचे आहे. 

12/05/2024 Image credit: Canva

आहारामध्ये समतोल राखण्यासाठी अन्य पोषक घटकांसह केळ्याचे योग्य प्रमाणातच सेवन करावे. 

12/05/2024 Image credit: Canva

केळी जास्त प्रमाणात खाल्ल्यास गॅस, पोटामध्ये जळजळ होणे, अतिसार यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

12/05/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

12/05/2024 Image credit: Canva

लांबसडक व घनदाट केस हवेत? या 6 फळांचे करा सेवन

marathi.ndtv.com