दिवसभरात इतके खाल्ले तूप, तर कमवाल जबरदस्त रूप 

Edited by Harshada J S Image credit: Canva

तुम्हालाही तूप खाणे आवडते का? तर मग नियमित किती प्रमाणात तूप खाणे आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

तुपामुळे स्वयंपाकाची चव वाढण्यास मदत मिळते, पण योग्य प्रमाणात तुपाचे सेवन केल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळू शकतात. 

Image credit: Canva

साधारणतः नियमित एक किंवा दोन चमचे म्हणजे 10-20 ग्रॅम तुपाचे सेवन करणे शरीरासाठी चांगले मानले जाते. 

Image credit: Canva

तूप खाल्ल्यास शरीराची पचनप्रक्रिया निरोगी राहण्यास मदत मिळते. आम्लाची पातळीही नियंत्रणात राहते. 

Image credit: Canva

तुपामध्ये फॅटी अ‍ॅसिड असते, ज्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. थकवा जाणवत असल्यास तुपाचे सेवन करावे. 

Image credit: Canva

तुपामध्ये व्हिटॅमिन्ससह कित्येक पोषकघटक आहेत, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. 

Image credit: Canva

मर्यादित स्वरुपात तुपाचे सेवन केल्यास वजनही नियंत्रणात राहते. कारण तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

गरम पाण्यात तूप मिक्स करून पिण्याचे जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com