उन्हाळ्यामध्ये ऊसाचा रस पिणे फायदेशीर की नुकसानदायक?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
19/05/2024
उन्हाळ्यात पचनास हलका असणाऱ्या आहाराचे सेवन करावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. तसेच द्रवयुक्त पदार्थांचे सेवन करणेही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
19/05/2024
Image credit: Canva
उन्हाळ्यात लोक आहारामध्ये लिंबू, पुदिना व्यतिरिक्त ऊसाच्या रसाचाही समावेश करतात. कारण यातील घटक पोट थंड व शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.
19/05/2024
Image credit: Canva
पण काही जणांना यामुळे आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याबाबत काही जणांना माहितीही नसते.
19/05/2024
Image credit: Canva
ऊसाचा रस कोणी प्यावा आणि कोणी पिणे टाळावे? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
19/05/2024
Image credit: Canva
मधुमेहग्रस्तांनी ऊसाचा रस पिणे टाळावे. कारण शरीरातील ग्लायसेमिक इंडेक्सच्या पातळीत वाढ होते. यामुळे शर्करेची पातळी नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.
19/05/2024
Image credit: Canva
ऊसाचा रस अधिक प्रमाणात प्यायल्यास दात किडण्याची समस्या निर्माण होऊ शकते. याव्यतिरिक्त निद्रानाशाच्या समस्येचाही सामना करावा लागू शकतो.
19/05/2024
Image credit: Canva
ऊसामध्ये कॅलेरीजचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे शरीराचे वजन वाढू शकते. जर तुम्ही वेट लॉस डाएट फॉलो करत असाल तर चुकूनही ऊसाचा रस पिऊ नये.
19/05/2024
Image credit: Canva
ऊसाच्या रसामुळे रक्त देखील पातळ होऊ शकते. यामुळे उन्हाळ्यामध्ये शक्यतो ऊसाचा रस पिणे टाळावे.
19/05/2024
Image credit: Canva
ऊसाचा रस अधिक प्रमाणात प्यायल्यास पोटाशी संबंधित समस्याही वाढू शकतात. यामुळे पचनप्रक्रिया कमकुवत होऊ शकते.
19/05/2024
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
19/05/2024
Image credit: Canva
आणखी वाचा
मुलांना भिजवलेले बदाम खायला का द्यावे?
marathi.ndtv.com