महिनाभर या काळ्या गोष्टीचे प्या पाणी, वेटलॉससह मिळतील असंख्य फायदे
निरोगी राहण्यासाठी शरीरामध्ये कोणत्याही पोषणतत्त्वांची कमतरता नसावी, असे म्हणतात.
Image credit: Canva आरोग्य निरोगी राहावे, यासाठी तज्ज्ञमंडळी आहारामध्ये सुकामेव्याचा समावेश करण्याचा सल्ला देतात.
Image credit: Canva महिनाभर भिजवलेल्या मणुक्यांचे पाणी प्यायल्यास शरीरास कित्येक पोषणतत्त्वांचा पुरवठा होऊ शकतो.
Image credit: Canva आयुर्वेदामध्ये मणुक्याचे पाणी प्रभावी उपाय मानले जाते. महिनाभर नियमित मणुक्यांचे पाणी प्यायल्यास शरीरास कित्येक लाभ मिळतात.
Image credit: Canva मणुक्यांचे पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. हे पाणी यकृत आणि आतड्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असते.
Image credit: Canva मणुक्यांमध्ये फायबरचे प्रमाण खूप असते. यामुळे बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
Image credit: Canva मणुक्यांमध्ये नैसर्गिक साखर असते, यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. मणुक्यांचे सेवन केल्यास शारीरिक थकवा दूर होऊ शकतो.
Image credit: Canva मणुक्यांमध्ये लोहाचे प्रमाण खूप असते, ज्यामुळे अॅनिमियाची समस्या दूर होण्यास मदत मिळते. हिमोग्लोबिनची पातळीही वाढते.
Image credit: Canva मणुक्यांमुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही. यामुळे वजन कमी होण्यासही मदत मिळते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
काळवंडलेले अंडरआर्म्स पटकन होतील गोरे, करा 3 प्रभावी घरगुती उपाय
marathi.ndtv.com