हे पाणी अति प्रमाणात प्यायल्यास होतील गंभीर दुष्परिणाम 

Edited by Harshada J S 
08/07/2024
Image credit: Canva

लिंबू पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी व अँटी-ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते व त्वचेचा पोतही सुधारण्यास मदत मिळते.

08/07/2024 Image credit: Canva

पण अति प्रमाणात पाणी प्यायल्यास आरोग्याशी संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात. जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva
08/07/2024

लिंबूमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड असते. या अ‍ॅसिडमुळे दातांच्या बाहेरील आवरणाचे नुकसान होऊ शकते. 

Image credit: Canva
08/07/2024

लिंबू पाणी अति प्रमाणात प्यायल्यास पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. सायट्रिक अ‍ॅसिडमुळे अ‍ॅसिडिटी, पोटामध्ये जळजळ होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Image credit: Canva
08/07/2024

लिंबू पाणी खूप प्यायल्यास त्वचेशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात. उदाहरणार्थ - त्वचेला खाज येणे, रॅशेज येणे इत्यादी.

Image credit: Canva
08/07/2024

लिंबू पाण्यात ऑक्सलेटचे प्रमाणही खूप असते, ज्यामुळे मूतखड्याची समस्या निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva
08/07/2024

लिंबू पाणी खूप प्रमाणात प्यायल्यास शरीरात इलेक्ट्रोलाइटची पातळी असंतुलित होऊ शकते. कारण यामुळे पोटॅशिअमच्या पातळीवरही परिणाम होतो. 

Image credit: Canva
08/07/2024

लिंबू पाण्यात ड्युरेटिक्स गुणधर्म खूप असतात. ज्यामुळे वारंवार लघवी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva
08/07/2024

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva
08/07/2024

आणखी वाचा

इवल्याशा पानांमुळे या गंभीर आजाराचा त्रास होऊ शकतो कमी

marathi.ndtv.com