जास्त मीठ खाल्ल्याने शरीरावर होतात 'हे' गंभीर परिणाम
Edited by Harshada J S Image credit: Canva
स्वयंपाकामध्ये मीठ नसेल तर जेवण चविष्ट होत नाही. पण आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केले तर आरोग्यास हानिकारक ठरते, हे तुम्हाला माहितीये का?
Image credit: Canva
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास रक्तदाबाची समस्या वाढू शकते. म्हणूनच रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रुग्णांना मीठ कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.
Image credit: Canva
हाडे आणि स्नायूदुखीमुळे त्रस्त असणाऱ्यांनीही कमी प्रमाणात मिठाचे सेवन करावे. कारण हाडे कमकुवत होऊ शकतात.
Image credit: Canva
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास मेंदूच्या कार्यप्रणालीवर वाईट परिणाम होतात. यामुळे विचारक्षमताही कमकुवत होते.
Image credit: Canva
मिठाच्या अतिरिक्त सेवनामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो. उदा-हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा खराब कोलेस्ट्रॉल इत्यादी.
Image credit: Canva
मीठ जास्त खाल्ल्यास किडनीवर ताण येतो आणि किडनीच्या कार्यप्रणालीवर वाईट परिणाम होतात.
Image credit: Canva
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास शरीरामध्ये पाणी जमा होऊ लागते. ज्यामुळे अवयवांवर सूज येते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
रिकाम्या पोटी धण्याचे पाणी पिण्याचे 7 फायदे
marathi.ndtv.com