प्रेग्नेंसीदरम्यान कोणकोणत्या फळांचं सेवन करावे?
Edited by Harshada J S Image credit: Canva
गर्भावस्थेदरम्यान योग्य आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे.
Image credit: Canva
विशेषतः फळं, कारण यामध्ये पोषणतत्त्वांचा साठा मोठ्या प्रमाणात असतो.
Image credit: Canva
प्रेग्नेंसीदरम्यान या पाच फळांचे सेवन केल्यास आरोग्यास मोठे फायदे मिळू शकतील.
Image credit: Canva
केळ्यामध्ये लोह, फॉलिक अॅसिड असते. ज्यामुळे शारीरिक थकवा दूर होण्यास आणि पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिड असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते आणि शरीर हायड्रेट राहते.
Image credit: Canva
सफरचंदामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स आहेत, जे आई आणि गर्भासाठी फायदेशीर असते.
Image credit: Canva
डाळिंब हे लोह आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते, अॅनिमियाची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
अॅव्होकाडोमध्ये हेल्दी फॅट्स, फॉलिक अॅसिड आणि पोटॅशिअम हे गुणधर्म आहेत. जे बाळाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या विकासासाठी फायदेशीर असतात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
Mental Health Tips : छोट्या छोट्या गोष्टींमुळे रडू येते?
marathi.ndtv.com