नारळ पाणी प्यायल्यास 'या' लोकांना होऊ शकतो गंभीर त्रास 

Edited by Harshada J S
06/05/2024
Image credit: Canva

नारळ पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असते. यातील पोषकतत्त्वांमुळे शरीराच्या कित्येक समस्या दूर होतात. 

06/05/2024

नारळाच्या पाण्यामध्ये पोटॅशिअम, सोडियम, कार्बोहायड्रेट व अन्य पोषकतत्त्व मोठ्या प्रमाणात असतात.

06/05/2024 Image credit: Canva

आरोग्य निरोगी राहण्यासाठी ही सर्व घटक आवश्यक आहेत.

06/05/2024 Image credit: Canva

गरजेपेक्षा अधिक प्रमाणात नारळ पाणी प्यायल्यास आरोग्यास गंभीर त्रास होऊ शकतो. जाणून घेऊया याचे दुष्परिणाम...

06/05/2024 Image credit: Canva

नारळ पाण्यात असणाऱ्या नैसर्गिक साखरेमुळे रक्तातील शर्करेवरही परिणाम होऊ शकतो. 

06/05/2024 Image credit: Canva

गॅस्ट्रोइंटेस्टाइनलशी संबंधित समस्या असल्यास नारळ पाणी पिणे त्रासदायक ठरू शकते. 

06/05/2024 Image credit: Canva

किडनीशी संबंधित समस्या असल्यास नारळ पाणी पिणे टाळावे. 

06/05/2024 Image credit: Canva

नारळ पाण्यामध्ये निसर्गतः पोटॅशिअमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे किडनीशी संबंधित समस्या असणाऱ्यांनी हे पाणी पिऊ नये. 

06/05/2024 Image credit: Canva

6 महिन्यांहून लहान असणाऱ्या बाळांसाठी नारळ पाणी हानिकारक ठरू शकते. नवजात बाळाच्या आरोग्यासाठी सुरुवातीचे 6 महिने आईचे दूधच फायदेशीर असते.

06/05/2024

जास्त प्रमाणात नारळ पाणी प्यायल्यास पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे मर्यादित स्वरुपातच नारळ पाणी प्यावे.

06/05/2024


Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

06/05/2024

आणखी वाचा

100 किलोचा ड्रेस घालून उर्फी जावेद आली टेम्पोतून

marathi.ndtv.com