तुम्हीही हा पांढरा पदार्थ खाताय? आरोग्यास फायदेशीर की हानिकारक, जाणून घ्या सविस्तर

Edited by Harshada J S Image credit: Canva
24/06/2024

चीज केवळ खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो. पण यासाठी मर्यादित स्वरुपातच चीजचे सेवन करावे. 

24/06/2024 Image credit: Canva

बर्गर, पिझ्झा, सँडविच यासारख्या पदार्थांची चव वाढवण्यासाठीही चीजचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 

24/06/2024 Image credit: Canva

चीजमध्ये आरोग्यास फायदेशीर असणारे प्रोबायोटिक्स असतात. हे प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य व पचनप्रक्रियाही सुधारण्यास मदत करू शकतात.

24/06/2024 Image credit: Canva

चीजमध्ये व्हिटॅमिन बी12चे प्रमाण भरपूर असते. व्हिटॅमिन बी12 हे मज्जातंतूचे कार्य, लाल रक्त पेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. 

24/06/2024 Image credit: Canva

प्रोटीनचा उत्तम स्रोत म्हणजे चीज. स्नायूंची वाढ, स्नायूंच्या दुरुस्तीमध्येही प्रोटीन महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. 

24/06/2024 Image credit: Canva

चीजमध्ये कॅल्शिअमचेही गुणधर्म असतात. यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.

24/06/2024 Image credit: Canva

चीज हे कॅल्शिअम, फॅट्स आणि प्रोटीनचे उत्तम स्त्रोत आहे. पण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मर्यादित स्वरुपातच याचे सेवन करावे. 

24/06/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

24/06/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

 कोथिंबीर आठवडाभर राहील फ्रेश,जाणून घ्या सोपी ट्रिक

Image credit: Canva
marathi.ndtv.com