चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिताय? होतील इतके गंभीर परिणाम 

Edited by Harshada J S Image credit: Canva

चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा पाहिजे;अशीच काहीशी अवस्था चहाप्रेमींचे असते. 

Image credit: Canva

काही लोक दिवसभरात पाचपेक्षा जास्त कप चहा पितात. तसेच एका वेळेस केलेला चहा अनेकदा गरम करून त्याचा आस्वाद घेतात. 

Image credit: Canva

पण एकच चहा वारंवार गरम करून पिणे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते.

Image credit: Canva

थंड झालेला चहा पुन्हा पुन्हा गरम केल्यास त्यामध्ये सूक्ष्मजीव तयार होतात, जे आरोग्यासाठी हानिकारक असतात. 

Image credit: Canva

एकदा तयार केलेला चहा वारंवार गरम केल्यास त्यातील पोषणतत्त्वही नष्ट होतात आणि पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva

वारंवार गरम केलेल्या चहामध्ये अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. ज्यामुळे अ‍ॅसिडिटी, गॅस, अपचनाचा त्रास होऊ शकतो. 

Image credit: Canva

या समस्या टाळण्यासाठी ताजा चहा प्यावा किंवा डबल बॉयलर पद्धतीने चहा गरम करावा. 

Image credit: Canva

तसेच उपाशीपोटी चहा पिणे टाळावे आणि चहासोबत पचनास हलक्या पदार्थांचे सेवन करावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

सकाळची सुरुवात मिठाचे पाणी पिऊन का करावी? तज्ज्ञांनी सांगितलं उत्तर

marathi.ndtv.com