उष्माघातापासून असा करा बचाव, हवामान केंद्राने दिल्या महत्त्वाच्या सूचना
सध्या तापमानामध्ये प्रचंड वाढ होत असल्याचे जाणवत आहे.
Image credit: Canva सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही वातावरणात बदल झाला असून तापमान 41 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.
Image credit: Canva महाशिवरात्रीनंतर तापमानात वाढ झाल्याने स्थानिक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत.
Image credit: Canva सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तापमानामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने (कुलाबा) वर्तवलीय.
Image credit: Canva उष्माघातापासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Image credit: Canva सिंधुदुर्गचे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी कोणकोणत्या सूचना दिल्या आहेत, जाणून घेऊया...
Image credit: Canva दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये.
Image credit: Canva उन्हामध्ये अतिकष्टाची कामे करू नये.
Image credit: Canva अर्ध्या-अर्ध्या तासाने पाणी पिणे गरजेचे आहे. घराबाहेर पडण्यापूर्वी डोके कापडाने झाकावे.
Image credit: Canva गर्भवती महिला तसेच लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.
Image credit: Canva उच्च प्रथिनेयुक्त फळे-पदार्थ आणि शिळे अन्न खाणे टाळावे.
Image credit: Canva आणखी वाचा
जायफळाचे सेवन केल्यास आरोग्यास मिळतील हे जबरदस्त फायदे
marathi.ndtv.com